अभिनेत्री कंगना राणावत हि विमानतळावर पोहोचली आहे आणि आता वाद पेटायला सुरवात झाली आहे कारण मुंबई विमानतळावर कंगना च्या समर्थनात रामदास आठवले यांचा आरपीआय आणि त्याच सोबत करणी सेना सामोरे आली आहे तर निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना आली आहे त्यामुळे त्याठिकाणी आरपीआय आणि करणी सेना एक गट आणि शिवसेना हा एक गट आमने सामने आला आहे.
अभिनेत्री कंगना हिचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना विमानतळावर पोहोचली काळे झेंडे घेवून ते तिचा विरोध करत आहे आणि त्यामुळे आरपीआय आणि शिवसेना आमने सामने आली आहे. काही वेळात कंगना बाहेर येईल.
मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने कंगनाला Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तर हिमाचल सरकारने देखील कंगनाला सुरक्षा देण्याचं जाहीर केलं होतं.
कंगनाच्या समर्थनार्थ करनी सेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. विमानतळाबाहेर ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत.

No comments: