loading...

MGID

loading...

भयंकर ; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस शेजारीच होती बसून तामिळनाडूमधील तिरुनिंद्रावूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील 7 वर्षीय मुलगा सॅम्युअल याचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. तीन दिवसांपर्यंत मुलाची आई सरस्वती त्याच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली आणि त्याच्या मृतदेहाला मुंग्या लागू नये म्हणून सतत त्याचं शरीर पुसत होती. हा भाग चेन्नईपासून काही अंतरावरच आहे.

शेजारच्यांना दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस सरस्वतीच्या घरी गेल्यानंतर सरस्वती आपल्या मुलाच्या मृतदेहाशेजारी बसली होती. पोलिसांनी तातडीने मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. इन्स्पेक्टर गुनासेकरन यांनी सांगितले की, ते दृश्य पाहून टीमला धक्काच बसला.

आईचं मानसिक आरोग्य ढासळलं

पोलिसांनी सरस्वती यांच्या कुटुंबीयांची बातचीत केली. त्यांनी सांगितले की सरस्वती या मानसिक रुग्ण आहेत. 7 वर्षांपूर्वी त्या पती जोस याच्यापासून वेगळी होती. त्या सीटीएच रोडवरील दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या. तर पहिला मजला आणि तळमजल्यावर त्यांचे नातेवाईक राहत होते. त्या फार कोणाशी संबंध ठेवत नव्हत्या.

क्लिनिक बंद झाल्याने होत होती उपासमार

सरस्वती पहिल्यांदा होमियोपॅथीची डॉक्टर होती. त्यांचं एक क्लिनिक होतं. त्या लोकांवर उपचार करीत होती. मात्र पतीकडून वेगळं झाल्यानंतर त्यांचं मानसिक आरोग्य खालावलं. त्यांच्या नातेवाईकांसोबत प्रॉपर्टीसंबंधित वादही सुरू होता. त्या बंगळुरुत राहणाऱ्या आपल्या भावासोबत संपत्तीची केस लढत आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात खूप परिणाम झाला होता. लॉकडाऊननंतप सरस्वतीचे क्लिनिक बंद झाले. त्यानंतर त्यांची उपासमार सुरू झाली.

भयंकर ; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस शेजारीच होती बसून भयंकर ; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस शेजारीच होती बसून Reviewed by Raj morey on September 02, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.