loading...

MGID

loading...

भारतातील 'या' मंदिरांत प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजाकर्नाटकमध्ये चंदनाच्या लाकडापासून ड्रग्ज रॅकेटचा पोलीस पर्दाफाश करत असताना उत्तर कर्नाटकातील मंदिरांमध्ये तर चक्क गांजा (Marijuana) पवित्र म्हणून वापरला जात आहे. येथील काही मंदिरांमध्ये चक्क प्रसाद म्हणून गांजा दिला जातो.

सरना, अवधूत, शप्त, अरुणा परंपरेत मारिजुआना किंवा गांजाचे विविध प्रकारे सेवन केले जाते. त्यास आध्यात्मिक अनुभूतीचे साधन मानले जाते. यादगीर जिल्ह्यातील तिनाथिनी येथील मौनेश्वर मंदिरात जानेवारीत होणाऱ्या जत्रेत भाविकांना प्रसाद म्हणून गांजाचे पॅकेट दिले जाते.

हा गांजा मौनेश्वर किंवा मनप्पा देवाची प्रार्थना केल्यानंतर खाल्ला जातो. मुख्य म्हणजे मंदिर समितीच्या वतीनेच हा गांजा दिला जातो. समितीचे सदस्य गंगाधर नायक म्हणाले की, गांजाचे सेवन येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते.

संत आणि भक्तांचा असा विश्वास आहे की हे पवित्र गवत अध्यात्मिक प्रबोधनाच्या मार्गावर लोकांना घेऊन जाते. मात्र मंदिराच्या बाहेर गांजा विक्रीस बंदी आहे.

नायक यांनी सांगितले की काही भाविक येथे येतात आणि गांजा घेतात. तर, काही लोक गांजा उकळतात आणि खातात. तर, काही लोकं तंबाखूची पावडर करून खातात. सरना समुदायावर संशोधन करणारे प्राध्यापक मीनाक्षी बाळे म्हणाले की, जे लोक मंदिरात गांजाचे सेवन करतात ते व्यसनाधीन नसतात.

भारतातील 'या' मंदिरांत प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा भारतातील 'या' मंदिरांत प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा Reviewed by Raj morey on September 11, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.