मोदी सरकार ने सध्या सर्व शासकीय कंपन्या विक्रीचा धडाका धरला आहे ज्यामध्ये बँका, विमानतळ आणि त्याच सोबत आता रेल्वे देखील आहे आता मोदी सरकारचा निशाना IRCTC वर आहे आता लवकरच याची पण विक्री होणार आहे.
IRCTCसाठी सरकार ऑफर ऑफ सेल्स अर्थात ओएफएसच्या माध्यमातून १५ ते २० टक्के शेअरची विक्री करू शकते. यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. खासगीकरणाच्या यादीत मोदी सरकारच्या अजेंड्यावर IRCTC सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. सरकार अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करत आहे. त्यात कमीत कमी चार मोठ्या सरकारी बँकांचा देखील समावेश आहे. IRCTC पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या हातात आहे. ज्याच्याकडे रेल्वेचे पर्यटन, कॅटरिंग, ऑनलाइन तिकीटचे बुकिंग आणि पाणी विक्रीचे अधिकार आहेत.
याआधी सरकारने १५१ रेल्वे गाड्यांच्या १०९ मार्गावर खासगी कंपन्यांना प्रवासी गाड्या चालवण्याची परवानगी दिली आहे. या माध्यमातून सरकारला ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेच्या एकूण नेटवर्कपैकी फक्त ५ टक्के खासगीकरण होणार आहे. या गाड्या १२ क्लस्टरमध्ये चालतील, ज्यात बेंगळूरू, चंदीगड, जयपूर, दिल्ली, मुंबई, पटना, प्रयागराज, सिकंदराबाद, हवाडा आणि चेन्नईचा समावेश आहे.

No comments: