The Ambedkar News च्या सर्व वाचकांनो काळजी घ्या सध्या देश्यात कोरोनाचा स्पोट होत आहे दररोज कोरोना नवनवीन रेकॉर्ड रचत आहे त्यामुळे काळजी घ्या आणि संभाळून राहा कारण आता कोरोना हा कम्युनिटी स्प्रेड होत आहे कारण त्यामुळे एका जन पासून १० जणांना कोरोनाची लागण होत आहे दरम्यान आता कोरोना दररोज लाखाने वाढत आहे असे दिसत आहे.
एकाच दिवसात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली. नवीन कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लवकरच देशात 1 लाख रुग्ण संख्याही नोंदवली जाऊ शकते. एवढेच नाही तर आज 1209 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 45 लाख 62 हजार 414 झाली आहे.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोकं निरोगीही झाले आहेत.
देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची ही अवस्था तेव्हा होती जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं.

No comments: