गणपती उत्सव साजरा केला जात असताना रुग्ण संख्यान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आपल्या महाराष्ट्र गणपती उत्सव साजरा केला जात असताना ६ सप्टेंबर पर्यंतच जवळपास दोन लाखाच्या वर रुग्ण गेले होते. आणि असे होत असतांना मात्र आपल्या महाराष्ट्रात डिस्चार्ज होणाऱ्या रुग्ण संखेत कमालीच घट झाली होती.
गेल्या दोन चार आठवड्या पासून तर कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ बगायला मिळाली आहे. ऑगस्ट मध्ये कोरोना रुग्ण संख्येत खूप स्थिरता होती परंतु अस अचानक काय झाली कि रुग्ण संख्या वाढायला सुरवात झाली. तर याच बाबतीत आता आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत.
सप्टेंबर मध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली विशेष म्हणजे नीट होणाऱ्या रुग्ण संख्येत आणि लागण होणाऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत पाहायला मिळाली आणि त्याच सोबत असे का झाले तर,
त्या माघे सर्वात मोठे जे कारण होते ते म्हणजे सरकार ने चालू केलेलं अनलोक ४ ज्या मुले पास बंद झाल्या बस चालू झाल्या आणि त्याच सोबत हॉटेल पण चालू करण्यात आल्या आणि याचा परिणाम असा झाला कि घरात बसलेली लोक अचानक पाने बाहेर पडली.
त्यातच परत गणपती उत्सव आला आणि मग सन साजरा करण्या करिता झुंबड उडाली सरकार कडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आआली होती पण लोकांनी त्याच पालन केल नाही आणि मग रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळाली.
रोग्य विभागाचे कोरोना सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यानुसार, "अनलॉक, गणेशोत्सव यामुळे काही प्रमाणात रुग्ण वाढले असले तरी त्यामागे ही प्रमुख कारणे नाहीत असे त्यांना वाटते."
ते सांगतात, "सप्टेंबर महिन्यात आम्ही कोरोनाच्या टेस्ट वाढवल्या आहेत. 4, 5 आणि 6 सप्टेंबरला दर दिवशी राज्यात कोरोनाच्या 90 हजाराहून अधिक टेस्ट झाल्या आहेत. ही संख्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 75-80 हजार इतकी होती."
"तसेच रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला दिसत असला तरी प्रत्यक्षात टेस्टिंगच्या तुलनेने सुरुवातीपासूनच 18-20 टक्के इतकी वाढ होत आहे," असंही आवटे म्हणाले.
राज्यात 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात सरासरी मृत्यूदर 1.74 टक्के इतका आहे.

No comments: