भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध मोर्चाच उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते थेटपणे फडणवीसांवर आरोप करत आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागली. मंत्रिपद गेल्यानंतर फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. नंतर मला राज्यसभेत पाठवतो म्हणून सांगितलं. मात्र आश्वासन देण्यापलिकडे काहीच झालं नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त कली.खडसे म्हणाले, विधानसभेत फडणवीसांनी मला त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली. राज्यपालपदाची इच्छा नसल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कन्येची शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला राज्यपालपद मिळणार आहे आणि श्रेष्ठींचाही त्याला होकार आहे असं फडणवीसांनी सांगतलं. नंतर काहीच झालं नाही असं खडसे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.त्यानंतर ते म्हणाले, मला राज्यसभेत पाठवतो असं सांगण्यात आलं. नंतर दुसरीच तीन नावं पाठवली मला डावलण्यात आलं. माझ्याकडे काही फोटो आणि पुरावे आहेत, ते उघड केले तर सगळ्यांनाच धक्का बसेल असं सांगत त्यांनी इशाराही दिला.
मुक्ताईनगर इथं गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांनाही त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यांना मी शुभेच्छा देत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व आमचं अलायन्स असून त्यामुळे निश्चितच सरकार येईल.
मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण खेळल्या गेलं ते बिहारमध्ये खेळल्या जाऊ नये. याचं त्याचं तिकीट काढून याला द्यायचं, दुसऱ्याला पाडायचं असं बिहारमध्ये होऊ नये असंही ते म्हणाले.

No comments: