बीड | सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे आणि त्यामुळे जवळपास गेल्या ७ महिन्या पासून महाराष्ट्रातील सर्वच कामे बंद आहेत आणि अश्या स्थिती मध्ये लोककलाकार आणि कामगार वर्गावर उपास मारीची वेळ आली आहे. लोकाकारा यांचे तर जवळपास गेल्या सात महिन्या पासून संपूर्ण कामेच बंद आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बीड जिल्ह्यातील गोंधली समाजातील लोकांना तर बायकोच्या अंगावरचे मंगळसूत्र मोडून जगायची वेळ आली आह. बीड जिल्ह्यातील शाहीर गणेश हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली होती परंतु आज त्यांच्यावरच उपसा मारीची वेळ आली आहे त्यांना तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या कोरोना मुले कुणीही मोठे लग्न करत नाहीय आणि त्यामुळे जागरण गोंधळ पूर्णपणे बंद आहेत आणि कार्यक्रम होत नसल्या मुले आणि कोरोना मुले तर गावात साधी लोक रस्त्यावर हि येत नाहीत मग कार्यक्रम तर दूरच राहिले आणि त्यामुळे त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे
बहीण तिचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्या विलास यांच्यावर आहे. विलासराव हे उत्तम संबळ वादक आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून कार्यक्रम बंद असल्याने कुटुंब चालवायच कसं हा त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विलास यांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून चार महिने कसं बसं घर चालवलं. मायबाप सरकार कलाकारांना तुम्हीच मदत करा अशी मागणी त्यांनी केली.दुसरीकडे, पती विलाससोबत गोंधळाच्या कार्यक्रमात जाणाऱ्या सुनंदा या देखील या चिंतेत आहेत. घरात खाणारी तोंडं जास्त आहेत आणि कमावणारे हात बंद पडलेत. यामुळे मी स्वतः मंगळसूत्र काढून नवऱ्याच्या हातात दिलं. त्यावरच आमचं आज कुटुंब चालतं आहे असं सांगताना सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं.
रिकामं ताट पाहिलं अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, राज्यात उपासमारीचं भीषण वास्तव
Reviewed by Raj morey
on
September 14, 2020
Rating:
No comments: