loading...

MGID

loading...

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक,

 


पुणे, दि, २ - राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर या ठिकाणी मोठे जनआंदोलन केले होते. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरां सहित बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केवळ सामाजिक भावनेतून हे आंदोलन करण्यात आले असले तरी आता मात्र यात राजकारण केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष यांनी एक पत्रक काढले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की ३० सप्टेंबर पर्यंत मंदिर उघडण्यात येणार नाही. मंदिर समितीचा आडमुठेपणा लोकांच्या जनभावनेच्या विरोधात असल्याची चर्चा आता केली जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर त्याचप्रमाणे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी एक पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ३० सप्टेंबर पर्यंत मंदिर उघडण्यात येणार नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हे पत्रक का काढले याबाबत आपल्याला जाणीव नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र मंदिर उघडायचे की नाही उघडायचे हा शासनाचा निर्णय असतो शासनाने आम्हाला दिलेला शब्द पाळतील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, Reviewed by Raj morey on September 03, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.