loading...

MGID

loading...

पतीच्या खुनाबाबत पत्नी सह अन्य चार आरोपींना अटक पतीच्या खुनाच्या आरोपा मध्ये पोलिसांनी पत्नी सह अन्य चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीने आपल्या भावा सह आणि बहिणी सोबत मिळून हा घात रचला होता त्यांनी तिच्या पतीचा खून करून त्याला जेसीबी च्या सहाय्याने पुरून टाकले होते 

हंचीणाल या ठिकाणी सकाळी हा खून झाला होता अशी माहिती समोर आली. त्या प्रकरणात पत्नी अनिता सचिन भोपळे (वय 32, रा नेर्ली-तामगाव), तिचा भाऊ कृष्णात उर्फ पिंटू राजाराम घाटगे (वय 26, रा. हंचिनाळ), बहीण वनिता कृष्णात चव्हाण (वय 29, रा. सिद्धनेर्ली, ता कागल) आणि नातेवाईक गणेश आण्णाप्पा रेडेकर ( वय 21, रा. हुन्नरगी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी सचिन सदाशिव भोपळे (वय 35, रा. नेर्ली-तामगाव, जि. कोल्हापूर) याचा खून केल्याचा आरोप आहे.

हा खून पती सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्या मुळे करण्यात आला आहे असे समोर येत आह. त्याबत पोलीस चौकशी करत असताना चारही आरोपी मुंबई ला पळून जाण्याच्या तयारीत होते परंतु पोलिसांनी त्याचा मागोवा काढला आणि त्यानुसार त्यानुसार वेशांतर करून उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. चौघांकडून खुनासाठी वापरण्यात आलेली दोरी,काठी असे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले आहे

पतीच्या खुनाबाबत पत्नी सह अन्य चार आरोपींना अटक पतीच्या खुनाबाबत पत्नी सह अन्य चार आरोपींना अटक Reviewed by Raj morey on September 09, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.