बारामती | राज्यात कोरोनाचे संकट काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीय अनेक ठिकाणी राज्यात पूर्ण पाने अनलोक प्रक्रिया सुरी करण्यात आली आहे परंतु याचा परिणाम असा होत आहे कोरोना रुग्ण संख्या दुप्पट स्पीड नि वाढत आहे. र्ज्यातील अनेक ठिकाणी रुग्ण संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त धोका मेट्रो शहरांना आहे परंतु आता त्याच सोबत कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट पण तयार व्हायला सुरवात झाली आहे. कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे त्यामुळे आता बारामती मध्ये आता ७ दिवसा साठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आतापर्यंत 1400 हुन अधिक कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपासून बारामतीतील मेडिकल आणि दुध वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. कुणालाही बाहेर किंवा आत प्रवेश दिला जात नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: