परभणी | गणेश स्थापनेच्या दिनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुस्तक थीम म्हणत गणपतीला भारतीय संविधानावर बसवले होते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याच सोबत महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवल्या परंतु तरी देखील प्रवीण तरडे वर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मुले आता आल इंडिया पंथर सेना प्रमुख दीपक केदार यांनी सांगितले आहे जर सरकार ने लवकरात लवकर कारवाई केली नाही आम्ही प्रवीण तरडे याच्या तोंडाला काळ फासू.
सिने निमार्ते मुळसी फेम अभिनेते प्रवीण तरडे यांनी गणपती बसवायच्या दिनी गणपती ला भारतीय संविधानावर बसवले होते त्यांतर त्यांनी जे आहे. त्याचा विडीयो काढत सोशल मिडीयावर सोडला होता त्यामुळे संविधानाला मानणारा वर्ग नाराज झाला होता आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो त्यामुळे परत कुणी असे करू नये म्हणून सर्वच आंबेडकरी जनते कडून प्रवीण तरडे वर गुन्हा दाखल करावा हि मागणी केली जात आहे.

No comments: