अकोला (प्रतिनिधी)- ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने सर्व सामान्य वर्गासाठी आग्रही भूमिका घेउन मी लॉकडाउन पाळणार नाहि आम्हाला जगु द्या. ही घोषणा करून जवळपास सर्वच दुकाने व सेवा सुरु करण्यास शासनाला भाग पाडले. त्यामुळे अनेकांना केवळ वंचित हा एकमेव आशेचा किरण दिसत आहे. आज लॉकडाउनमुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. लोकांना पोटभर जेवण वाढणाऱ्या कामगारालाच आज उपाशी राहावे लागत आहे. त्यामुळे केवळ पार्सल नको तर सर्वच हॉटेल जेवणासाठी खुली करावीत जेणेकरून या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कामगारांना परत काम मिळेल व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येउ नये.याकरिता अखिल भारतीय हॉटेल्स कामगार असोसिएशनच्यावतीने ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय हॉटेल कामगार असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील अंभोरे, अकोला जिल्हाध्यक्ष किशोर सदाशिव, वाशिम जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, परभणी जिल्हाध्यक्ष शैलेन्द्र थोरात, अमरावती जिल्हाध्यक्षमहेश इंगोले, किशोर जावके, तानाजी नरवाडे, संतोष घुगे, संदिप खंडारे यांच्या सोबतच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, पराग गवई, पं स सदस्य अजय शेगावकर, माजी नगरसेवक रामा तायडे उपस्थित होते

No comments: