loading...

MGID

loading...

जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू आणि महात्मा गांधीला झापतात

May 01, 2020

आम्ही तिघेही अस्पृश्य "
स्वतंत्र भारताची घटना लिहिण्याचेकाम कोणावर
सोपवावे यावर विचार विनिमय करण्याकरिता पंडित जवाहरलाल
नेहरू यांच्या '
त्रिमूर्ती या दिल्लीतील
विशाल निवासस्थानी बैठक बोलविण्यात
आली होती.
त्या बैठकीस महात्मा गांधी,राजेंद्र
प्रसाद, पंडित मदनमोहन
मालवीय ,राजाजी , श्यामप्रसाद
मुखर्जी , डॉ .
सर्वपल्ली राधाकृष्णन
इत्यादी मान्यवर भारतीय नेते तसेच
सर्व संस्थानिक राजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित
होते.

loading...त्या बैठकीस इतर कोणासही आत
सोडू नये अशी सक्त ताकीद
पंडितजींनी आपले
खाजगी चिटणीस
श्री.एम.ओ .मथाई
यांना दिली होती .
बैठक ऐन रंगात आली होती .
इतक्यात त्या बैठकीत
कोणी तरी मोठमोठ्याने बोलत आहे
असे श्री. मथाई यांच्या लक्षात आले , पण
कोण बोलत आहे हे त्यांना समजेना. तसेच दरवाजा उघडून
पाहणे तर शक्यच नव्हते . श्री.मथाई हे
अनेक वर्षापासून पंडित नेहरूंचे
खाजगी चिटणीस होते.
त्यांच्या कानांना अशी सवय
झाली होती कि पंडितजीं
कोणीही उंच आवाजात बोललेले
त्यांनी कधीच ऐकले नव्हते. मग
आज पं .नेहरू तसेच महात्माजींच्या समोर
मोठ्याने बोलणारा हा नवीन आवाज कोणाचा ? हे
जाणून
घेण्यासाठी त्यांनी आपल्या वृद्ध
शिपायाला विचारले कि हा आवाज कोणाचा आहे ? त्या शिपायाने
दार किलकिले केल्यानंतर दोघांनी आत पहिले
तेव्हा त्यांच्या कानात एक वाक्य
बंदुकीच्या गोळीप्रमाणे सनसनत
घुसले.
' तुम्हांला रामायण पाहिजे होते,
तेव्हा तुम्ही वाल्मिकीकडे गेलात
'
' तुम्हांला महाभारत पाहिजे होते,
तेव्हा तुम्ही व्यासांकडे गेलात '
' आता तुम्हांला स्वतंत्र
भारताची घटना हवी आहे ,
म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात,
आम्ही तिघेही अस्पृश्य
आहोत.
मी लिहिलेली घटना तुम्हाला पंसंत
पडेल का ?
हे वाक्य ऐकताच
श्री मथाईंनि त्या शिपायाला विचारले,
' हे रुबाबदार , विलायती कपडे घातलेले,
करारी बोलणारे परंतु विद्देचे तेज
ज्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत आहे
आणि त्यातही महात्मा गांधी व
पंडितजींच्या समोर ताड॒ ताड॒ बोलणारे हे
सद्गृहस्थ कोण आहेत ?
त्यावर तो शिपाई उत्तरला ,
' हे आहेत अस्पृश्यांचे उद्धारकर्ते , दलितांचे
कैवारी , तमाम दिन-दुबळ्यांचे दैवत डॉ.
बी.आर.तथा बाबासाहेब आंबेडकर .'
जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू आणि महात्मा गांधीला झापतात जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू आणि महात्मा गांधीला झापतात Reviewed by Raj morey on May 01, 2020 Rating: 5

Adnow

loading...
Powered by Blogger.