loading...

MGID

loading...

बाबासाहेब क्रिकेट खेळायचे आणि त्यासोबत त्यांच्या या आवडी सुद्धा होत्या…


बाबासाहेबांना फक्त पुस्तक वाचनाचीच आवड नव्हती तर खेळांचीसुद्धा आवड होती. तरुणपणात ते अनेक खेळ खेळत असत. या संदर्भात धनंजय कीर लिहितात, “आपल्या बालवयात ते क्रिकेट खेळत. धारवाडला प्रकृती सुधारण्यासाठी त्यांची पहिली पत्नी गेली असता तेथील दलित समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतः चालविलेल्या वसतिगृहातील मुलांसंगे ते क्रिकेट खेळले. एकोणीसशे वीसच्या आसपास ते गंजीफ्याच्या खेळात रंगत असत. ब्रिजसुद्धा खेळण्याचा आस्वाद घेत. त्याकाळी समुद्रात स्नान करण्यात ते रमत असत. नानकचंद रत्तू याबाबत लिहितात की, बाबासाहेब कधी कधी क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचे त्यासोबतच टीमचे नेतृत्व करायचे.
कपड्यांची आवड :
बाबासाहेबांना रुबाबदार कपड्यांची फार आवड होती. वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेल्या त्यांच्या छायाचित्रांमध्ये ते वेगवेगळ्या रुबाबदार कपड्यांमध्ये दिसतात. प्रसंगानुरूप वेगवेगळे कपडे वापरणे बाबासाहेबांना फार आवडायचे. ते आपल्या अनुयायांना देखील चांगले कपडे वापरायला सांगत असत . १५ फेब्रुवारी १९४१ रोजी मुंबई येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात, “ . . . . तुम्हाला कपडे वापरण्याच्या बाबतीत फार वाईट सवय लागलेली आहे. तुम्ही कामावर जाताना, फिरावयास जाताना किंवा लग्नाला जाताना एकच कपडा घालीत असता. हे फार वाईट आहे. कामावर जाण्याकरिता वेगळे व फिरावयास जाण्याकरिता किंवा लग्न कार्यात जाण्याकरिता चांगले कपडे करा. दोन वेळचे खावयास नसले तरी चालेल परंतु चांगले कपडे करा. कारण कपड्यापासून आज जगात मान आहे.’ १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबई मधील भाषणात बाबासाहेब म्हणतात, एक नूर आदमी व दस नूर कपडा’ अशी म्हण आहे. बाहेर पडताना तुमचा पोषाख स्वच्छ पाहिजे. कपडा पाहूनच तुमच्याबद्दल प्रथम आदर वाटला पाहिजे.
घड्याळांची आवड : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रुबाबदार घड्याळांची फार आवड होती. वेगवेगळ्या आकारांची नक्षीदार घड्याळे त्यांना फार आवडत असत. त्यांच्या संग्रही अनेक प्रकारची भिंतीवरील घड्याळे, मनगटी घड्याळे आणि शेरवानी व जोधपुरी कपड्यांच्या खिशात ठेवता येतील अशी घड्याळे होती. यापैकी काही घड्याळे चांदीची तर काही सोन्याची होती. त्यांच्या मनगटी घड्याळांनासुद्धा सोन्याचा पट्टा होता.
ऐटदार पेनांची आवड : 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ऐटदार पेनांची फार आवड होती. सामान्य पेन त्यांना आवडत नसत, मोठ्या आकाराचे फाऊंटन पेन त्यांना फार आवडत. कोटाच्या खिशाला शोभून दिसतील असे रुबाबदार पेन ते वापरत असत. त्यांच्याकडे काही सोन्याचे पेनसुद्धा होते. त्यांचा वापर ते विशेष प्रसंगी करत असत. बाबासाहेबांना त्यांच्या अफाट लेखन कार्यासाठी सतत वेगवेगळ्या पेनांची गरज भासायची म्हणून ने जेव्हा पेनांची खरेदी करायचे तेव्हा ते एकाच वेळी पाच-सहा पेनांची खरेदी करायचे. बाबासाहेबांच्या या आवडीविषयी त्यांचे सहायक नानकचंद रत्तू लिहितात, ‘पुस्तकासोबत बाबासाहेबांना विविध प्रकारचे आणि आकाराचे फाऊंटन पेन आवड होती. त्यांना असाधारण पेन आवडत नसत. त्यांच्या आवडीचे पेन पार्कर, शेफर आणि वॉटरमेनचे होते.
वाचनाची आवड : 
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची फार आवड होती. त्यांच्या वडिलांनी सुभेदार रामजी आंबेडकरांनी बाबासाहेबांना लहानपणापासून वाचनाची गोडी लावली होती. ते त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांची पुस्तके आणून देत असत. जर त्यांच्या जवळचे पैसे संपले तर ते आपल्या मुलींच्या सासरी जाऊन मुलीचा दागिना मागून घ्यायचे तो गहाण टाकून मिळालेल्या पैशातून ते पुस्तके घ्यायचे नंतर पेन्शन मिळाल्यानंतर त्या पैशातून तो दागिना ते सोडवून आणायचे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच बाबासाहेबांना लहानपणापासून अवांतर वाचनाची गोडी लागली.
बाबासाहेब क्रिकेट खेळायचे आणि त्यासोबत त्यांच्या या आवडी सुद्धा होत्या… बाबासाहेब क्रिकेट खेळायचे आणि त्यासोबत त्यांच्या या आवडी सुद्धा होत्या… Reviewed by Raj morey on April 20, 2020 Rating: 5

No comments:

Adnow

loading...
Powered by Blogger.